Breaking News

कचरा डेपोभोवती संरक्षक भिंत बांधा : मागणी


कोपरगाव : संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेला कचरा डेपो अनेक वर्षांपासून मोकळ्या जागेत असल्याने जवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मोकाट जनावरे या कचऱ्यातील प्लास्टिक खाऊन दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्यासाठी या कचराडेपोला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ह्युमन राईट असोसिएशनचे कोपरगाव तालुकाध्यक्ष् विठ्ठल भुजाडे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना दिले आहे. यात म्हटले आहे, की येत्या आठ दिवसांत याप्रकरणी कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.