प्राचार्य इंद्रभान डांगे ज्ञानमहर्षि पद्म पुरस्काराने सन्मानित
राहाता येथे प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाची स्थापना करून गेल्या ४५ वर्षांपासून इंद्रभान डांगे विद्यादानाचा पवित्र यज्ञ चालवत आहेत. ज्ञान, संस्कार, शिस्त या त्रिसूत्रीतून त्यांनी घडवलेले परिपूर्ण विद्यार्थी आज जगभर सामाजिक विकासासाठी झटत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच अनेक शैक्षणिक संस्थांनाही मदतीचा हात देऊन व मार्गदर्शन करून प्राचार्य डांगे यांनी मोठे बनविले. त्यांच्या अलौकिक कार्यातूनच डांगे पॅटर्नची निर्मिती होऊन सध्या २५ स्कूल्स महाराष्ट्रात कार्यरत आहेत. डांगे यांची आदर्श जीवनशैली प्रत्येकाने जीवनात उतरवून जीवन समृद्ध करावी, अशी आहे, असे विचार कै. मातोश्री भागिरथी सिताराम निघुते मेमोरियल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. निलिमा निघुते यांनी व्यक्त केले.