Breaking News

विरोधक न केलेल्या कामांचे श्रेय घेतात : राऊत

कोपरगाव शहर प्रतिनिधी - आ. स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन सरपंच बबूता माळी आणि सदस्य मंडळाने गावात विविध विकासकामांचा निधी मंजूर करून घेतला. विरोधकांनी ते कामे आपण केल्याचा आव आणला. विकासकामांचे लोकार्पण करून घेतले जे कामे त्यांनी केलीच नाही, त्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी केला आहे, असा आरोप भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत यांनी केला आहे.

ते म्हणाले, गावात कोणतीही योजना आणताना जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर अनेक वेळा कागदपत्रांसह पाठपुरावा करावा लागतो. तेव्हा कुठे कामे मार्गी लागतात. कोल्हे गटाचे तत्कालीन सरपंच बबुताई माळी यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गव्हाणे वस्ती ते बोंडखळ वस्ती रस्ता डांबरीकरण खर्च १३ लाख, जायपत्रे वस्ती जिल्हा परिषद शाळा वाॅलकंपाऊड ३ लाख सोनेवाडी मराठी शाळा वाॅलकंपाऊड ३ लाख आदी ५० लाखांहून अधिक खर्चाची विकासकामे आम्ही पुर्ण करुन घेतली. नवीन ग्रामपंचायतीची सत्ता स्थापन होऊन केवळ साडेतीन महिने पूर्ण झाली. सोनेवाडीची जनता दूधखुळी नसून ही कामे त्यांनी केली, यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. हा केवळ राजकीय डाव असल्याचा उलगडा राऊत यांनी केला.