सहकारी संस्था भरभराटीमध्ये काळेंचे योगदान : काळे
कोपरगाव ता. प्रतिनिधी - समाजाकडून आपण जे घेतो, ते या समाजाला परत केले पाहिजे, अशा उदात्त विचारातून माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या. प्राणपणाने त्या जोपासल्या. त्यामुळे या सहकारी संस्था आज प्रगतीपथावर आहेत. या सहकारी संस्था भरभराटीमध्ये कर्मवीर काळेंचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले.
तालुक्यातील पोहेगाव येथील श्रीकृष्ण विविध सहकारी सेवा सोसायटीचा सभासद पातळीवर ३० जून २०१७ अखेर १०० टक्के वसूली झाली. त्याबद्दल जिल्हा बँकेच्यावतीने या संस्थेला संचालिका काळे यांच्या हस्ते लॅपटॉप सप्रेम भेट देण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यस्थानी गोरक्षनाथ रोहमारे होते.
प्रारंभी एम. टी. रोहमारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अशोक घेर यांनी केले. याप्रसंगी विठ्ठलराव औताडे, रावसाहेब औताडे, अतुल औताडे, ज्ञानदेव औताडे, देवेन रोहमारे, रामनाथ घोटेकर, विठ्ठल जावळे, सुनील गवळी, सुधीर थोरात, जवळकेचे पोलीस पाटील थोरात, अशोक घेर, बाळासाहेब खांडगे, शिंदे, चौधरी आदी उपस्थित होते.