Breaking News

सावरकरांचे कर्तृत्व शहारे आणणारे : थोरात


कोपरगाव : भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात विनायक दामोदर सावरकर यांचे सर्वात मोठे योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख आजही आठवला तर अंगावर शहारे येतात, असे प्रतिपादन कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद थोरात यांनी केले.
कोपरगांव शहर व तालुका भाजपा पक्षाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पराग संधान, बाळासाहेब नरोडे, शिवसेनेचे कैलास जाधव, शहराध्यक्ष कैलास खैरे, सुशांत खैरे, गोपी गायकवाड, वैभव गिरमे, विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.