Breaking News

संजीवनी’च्या विद्यार्थ्यांना अॅक्सिस बॅंकेत संधी

कोपरगाव शहर प्रतिनिधी - संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत एम. बी. ए. विभागाच्या आठ विद्यार्थ्यांची खासगी बॅंकिंग क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या अॅक्सिस बॅंकेने असिस्टंट मॅनेजर या पदासाठी निवड केली आहे. पहिल्या वर्षीच या विद्यार्थ्यांना ३. २० लाखांचे पॅकेज देवु केले आहे. या सर्व विध्यार्थ्यांची निवड संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत झाली, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

यासंदर्भात संस्थेच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की संजीवनी’मधून सुसंस्कार रुजविले जात असल्यामुळे यापूर्वी संजीवनीच्या विध्यार्थ्यांची निवड केलेल्या कंपन्या, बॅंका या विद्यार्थ्यांना प्रथम पसंती देतात. अनेकदा उद्योग जगतातील नामवंत कंपन्या व बॅंकांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालकांना बोलवून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते. 

माजीमंत्री शंकरराव कोल्हे, कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे आदींच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. यामध्ये कैलास एकनाथ वाणी, महेश बाळासाहेब उंडे, शुभम कैलास उदावंत, वैभव राजेंद्र देशपांडे , प्रिया विनोद पांडे, प्राजक्ता दत्तात्रय कुलकर्णी, भावना नंदु बेलदार, निकीता दिपक पांडे आदींचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांनी निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे, प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, एम. बी. ए. विभागाचे प्रमुख डाॅ. विनोद मालकर, एम. बी. ए. विभागाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट आफीसर प्रा. योगेश आहेर यांना धन्यवाद दिले आहेत.