Breaking News

मुलींचे लैंगिक शोषण करणारा कोच अटकेत


अकोला, दि. 14, मे - बॅडमिंटन कोच (प्रशिक्षक)ने सिव्हिल लाइन्स रोड वरील आयएमए हॉलमध्ये अल्पवयीन खेळाडू मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी कोचला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बॅचेस संपल्यावर तो विशेष मुलींना थांबवून त्यांच्यावर बॅडमिंटन हॉलमध्येच बलात्कार करायचा.
 
काही दिवसांपूर्वी एका मुलीने असह्य झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेत धाव घेत नराधम कोच राहूल सरकटे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. मुलींचे बयाणावरून काही धक्कादायक खुलासे समोर आले. पीडित मुलगी इयत्ता आठव्या वर्गात होती. तेव्हापासून ती बॅडमिंटनचा सराव क रायची. सुरुवातीला ती ऑफिसर क्लबमध्ये बॅडमिंटन शिकायची. येथेच त्याची पीडित मुलीवर नजर पडली. त्यानंतर सिव्हिल लाइन्समधील आयएमए हॉलमधील बॅडमिंटन हॉल या कोचने ब ॅडमिंटनचे प्रशिक्षणवर्ग चालवण्यासाठी घेतला. 20-20 मुलांच्या बॅचेस तो घेत होता. 

ऑक्टोबर 2013 मध्ये बॅडमिंटनकोचने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला सतत धमकावत होता. शारिरिक अत्याचाराचे त्याने फोटोही काढले होते. फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करीत होता. संध्याकाळी बॅसेच संपल्यानंतर मुलींना थांबवून सहा, सात वाजताच्या दरम्यान खेळाडू निघून गेल्यावर तो अत्याचार करायचा. काही दिवसांपूर्वी मुलीने पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून ती तक्रार चौकशीत होती. अखेर शनिवारी या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.