Breaking News

जिल्हाध्यक्षपदी मनसेच्या स्वाती कदम यांना बढती


डोंबिवली, दि. 14, मे - कल्याण पूर्व-पश्‍चिम जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपसचिव पदावर काम करणार्‍या स्वाती कदम जिल्हाध्यक्षपदी बढती मिळाली आहे. बारा वर्षांपासून त्यांनी पक्षात काम करत असून विविध समाजोपयोगी कार्य केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बढती दिली आहे. त्यांच्या नियुक्तीने कल्याणमध्ये कदम यांचे धुमधडाक्यात स्वागत झाले.

शुक्रवारी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे यांनी स्वाती कदम यांना नियुक्तीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. कल्याणच्या प्रभाग क्रमांक - 26 (रामबाग खडक) परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेबद्धल आवाज उठवून प्रशासनाला जेरीस आणले होते. कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवरील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. 

रोगराई फैलावल्याच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण कल्याण परिसरात कीटक नाशक फवारणी करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली होते, कल्याणमधील कचराप्रश्‍नावर गाड्या अडवून निषेध नोंदवला होता. क ल्याणमधील सर्व रस्ते चकाचक होण्यासाठी घेराव अधिकार्‍यांना घेराव घालण्यात कदम यांचा पुढाकार होता. रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. शहराध्यक्षा शीतल विखणकार यांच्यासह पदाधिकारी व महिलांनी जिल्हाध्यक्षा कदम यांच्या नियुक्तीबद्दल जल्लोष साजरा केला.