अधिवेशन किमान चार आठवडे चालले पाहिजे - धनंजय मुंडे
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केवळ १० दिवस कामकाज होणार आहे. विदर्भासारख्या मागास भागात होणारे अधिवेशन किमान चार आठवडे चालले पाहिजे. प्रादेशिक असमतोलासंबंधीच्या केळकर अहवालावर डिसेंबर २०१४ मध्ये चर्चा झाली. मात्र या मूळ अहवालावरील कृती अहवालासंदर्भात सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे.
राज्याच्या मागास भागाच्या समतोल विकासासाठी ते गरजेचे आहे. ती चर्चा व्हावी तसेच विदर्भ आणि राज्यातील अनेक गंभीर प्रश्न आहेत. १० शासकीय, पाच प्रलंबित विधेयके आहेत. इतके कामकाज पाहता अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.