Breaking News

येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता.

पुणे : राज्यात मराठवाड्याच्या भागात 5 आणि 6 मे दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍यामुळे हा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मराठवाड्यात पाऊस होईल मात्र राज्यातील इतर भागात पाऊस होणार नाही असा अंदाज कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यात 5 ते 6 मेच्या दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी राज्यात इतर भागात यावेळी पाऊस होणार नाही. मात्र मेच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजे 11 व 12 मे ला राज्यभरात पाऊस होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरीही उष्णतेत कसलाही फरक पडणार नाही. या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज डॉ. साबळे यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः पुर्व विदर्भातील चंद्रपुरात 48 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ होणार आहे. तर उर्वरित राज्यात सरासरी 40 ते 42 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान राहणार आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने तसेच वनीकरण कमी असल्याने तापमानात मोठी वाढ होत असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 5 नंतर आपली कामे करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल लवकरात लवकर बाजारात विक्रीस न्यावा, असा उपदेशही कृषी हवामान शास्त्रज्ञ करत आहेत.