Breaking News

वेरुळ घाटातील अपघातात 2 ठार

औरंगाबाद - वेरूळ घाटात मिनी बस आणि कारच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात झाला आहे. या अपघातात पंकज रामनाथ शिंदे जागीच ठार झाले. तर अन्य एकाला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. वेरुळ घाटातील एका वळणावर मिनीबसचे नियंत्रण सुटून ती कारवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. या मिनीबसमध्ये 31 प्रवासी होते. हे लोक तेलंगणा राज्यातून देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते.