Breaking News

काँग्रेसमध्ये युवकांना मोठी संधी : आ. डॉ. तांबे


संगमनेर : खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे देशातील तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. निखिल पापडेजा यांची जिल्हाध्यक्षपदी निवड संगमनेरकरांसाठी भूषणावह आहे. लोकशाही जपणार्‍या काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा एनएसयुआयच्या अध्यक्षपदी निखिल पापडेजा यांची निवड झाल्याबद्दल युवक काँग्रेसच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रवेश काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे, नितीन अभंग, दत्तू भोकनळ, अ‍ॅड. सुहास आहेर, बाळासाहेब गुंजाळ, विजय उदावंत, अमित गुंजाळ, श्रेयस कर्पे, गौरव डोंगरे, विश्‍वास निसाळ, पवन शिंदे, प्रतिक शेटे, विठ्ठलदास आसावा, शाहु पानसरे, अजित मंडळ, बाबा शिंदे, अंबादास आडेप, संजय कानवडे, सुरेश शिंदे आदींसह युवक उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना आ. डॉ. तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाला १३५ वर्षांची मोठी परंपरा आहे. देशासाठी काँग्रेस नेतृत्वाने त्याग आणि बलिदान केले आहे. मागील ६० वर्षांत देशात मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील निवडणुकीत केवळ खोट्या भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजपा सरकावर देशवासिय नाराज आहेत. पुन्हा एकदा जनतेला सर्वसमावेशक व लोकशाहीचा विश्‍वास असणार्‍या काँग्रेसची गरज भासू लागली आहे. आजच्या काळात काँग्रेसला मोठे भवितव्य आहे. यामध्ये सुशिक्षीत तरुणांनी पुढे आले पाहिजे. पापडेजा यांच्या रुपाने तालुक्याला जिल्हापातळीवर संधी मिळाली आहे. विद्यार्थी दशा ही जीवनाची दिशा ठरवणारी असून जास्तीतजास्त युवकांनी काँग्रेसमध्ये क्रियाशील व्हावे.

नूतन पापडेजा यांनी आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवा नेते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील १० वर्षांत विद्यार्थी संघटनेत मोठे काम केले आहे. पक्षनिष्ठा आणि समयसूचकतेबरोबर काँग्रेस पक्षाचे विचार युवकांमध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सोशल मिडियात उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची धूरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. या निवडीबद्दल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदींसह अनेकांनी पापडेजा यांचे अभिनंदन केले.