Breaking News

करंजीत मटका आड्यांवर पोलीसांचा छापा


करंजी - पाथर्डी तालूक्यातील करंजी येथे पोलीस चौकीसमोर सुरू असलेल्या मटक्याच्या आडयांवर शेवगावचे डीवायएसपी अभिजीत शिवथारे व पाथर्डीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला . यामध्ये मटका घेणारा मुख्यबुकी संतोष भाकरे हा मटका घेताना पोलीसांना आढळून आला असता त्याच्याकडील 860 रुपये व मटक्याच्या साहित्यासह त्याला अटक करण्यात आली आहे . 

गेली अनेक दिवसापासुन करंजी येथील पोलीस चौकीसमोरील पानटपरीमध्ये संतोष भाकरे मटक्याचा खुलेआम आड्डा चालवत असल्याची कुणकुण शेवगावच्या पोलीस अधिकार्‍यांना लागली होती त्यानंतर मंगळवारी उशिरा साध्या वेशात आलेल्या पोलीसांनी या मटक्याच्या आड्यांवर छापा टाकला असता संतोष भाकरे हा मटका घेत असतांना पोलीसांनी त्याला अटक केल्याने काही वेळातच इतर मटका एजंट बसस्थानक परिसरामधून पसार झाले .करंजी येथे जुगार , मटका, दारू खुलेआम सुरू आहे . हे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी ग्रामस्थामधुन होत आहे. तिसगाव येथे छापे टाकल्यानंतर येथेही छापे पडावेत अशी मागणी जोर धरत असतानाच शेवगाव व पाथर्डी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत मटका घेणार्‍यांवर कारवाई केली . या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. बसस्थानक परिसरामधील एकाच टपरीत मटका, दारू, पेट्रोल सारखे अवैदधंदे खुलेआमपणे सुरू आहेत .करंजी येथील सर्व अवैदधंदयाकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे . मटका अड्यांवर टाकलेल्या छाप्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सतिष उध्दव वाघ यांनी फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार काकासाहेब राख हे करत आहेत .