Breaking News

सालवडगाव येथे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर उत्साहात


शेवगाव - माननीय डॉ. पुरुषोत्तम भापकर साहेब भारतीय प्रशासन सेवा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाने सालवडगाव ( ता. शेवगाव) येथील जगदंबा माता मंदिरात एक दिवसीय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी योगेश डफाडे प्रकल्पाधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर व सारंग शेतवाल समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन केले. 

योगेश डफाडे यांनी कोणत्याही माणसाला उद्योग करता येतो. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेतला पाहिजे . सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यक्तिमत्व विकास, सिद्धी प्रेरणा, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच महिला बचत गटासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम, मागासवर्गीय एस टी व एन टी यांच्यासाठी शासन वेळोवेळी विविध योजना राबवत असते. त्या योजनेचा इतर तरुणांनी लाभ घेतला पाहिजे .या कार्यक्रमास दादासाहेब डोंगरे, बाबासाहेब गोर्डे, विठ्ठला औटी, भिवसेन गिरमकर, रामकिसन तापडिया , संतोष महाराज वैद्य, ज्ञानेश्‍वर भापकर, 
कैलास माडे, बाळासाहेब वांढेकर, नंदू नांद्रे ,रामनाथ रुईकर, लताबाई भापकर, यमुनाबाई भापकर, जनाबाई भापकर, शिवकन्या दळवी, शिवाजी औटी, तुळशीराम रुईकर, मारूती बोडखे, आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा रुईकर तर आभार संदीप भापकर यांनी मानले