Breaking News

कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना न्यायालयाचा दिलासा

मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषमुक्त ठरलेले काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांनाही लाचलुचप्रतिबंधक न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता यांना आज न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे.

काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चार महिन्यापूर्वी न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुन्हे विभागाने 2015 मध्ये कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ती घेतली न गेल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. आजच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला आहे.