Breaking News

विमान उशीर किंवा रद्द झाल्यास मिळणार पूर्ण पैसे

नवी दिल्ली/प्रतिनिधी - विमानप्रवास करणार्‍यांना केंद्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता विमानाचे उड्डाण उशीरा झाल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतील. चार दिवस पूर्वीपर्यंत आपले तिकीट रद्द केल्यास तुमचे पैसे कापले जाणार नाहीत. तिकीट रद्द करण्याचा किमान दंड किती असावा, यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत. हे सर्व निर्णय क ॅबिनेटची परवानगी मिळताच लागू करण्यात येतील. हे नियम देशी व विदेशी अशा सर्व विमानसेवा कंपन्यांना लागू असतील. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनीसिांगितले, की विमानसेवा कंपनीच्या चुकीमुळे विमानाचे उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना संपूर्ण पैसे परत मिळतील. जर पैसे परत केले नाही तर कंपनीला प्रवाशाला दुसर्‍या विमानाचे तिकीट द्यावे लागेल. यासाठी कंपनी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाही. 

प्रवासात कोणत्याही प्रकारचा उशीर झाल्यास विमानकंपनीला प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी लागेल. विमान तिकीट बुकिंगनंतर 24 तासांचा लॉग इन पर्याय उपलब्ध असेल. 24 तासांच्या आत तिकीटावरील नाव, पत्ता इत्यादींमध्ये बदल मोफत करता येतील. तिकीट रद्द करण्याचे शुल्क बेसिक फेअर व फ्यूएल चार्जच्या बेरजेपेक्षा अधिक नसेल. 
घरगुती विमान प्रवाशांना पेपरलेस सुविधा मिळेल. यासाठी प्रवाशांना युनिक क्रमांक देण्यात येईल. प्रवासाच्या वेळी त्यांना हा क्रमांक सांगावा लागेल. प्रवाशांसाठी शासनाने आणखी एक पर्वणी आणली आहे. जर तुम्ही या उन्हाळ्यात फिरायला जाण्याची योजना आखताय, तर तुम्ही स्वस्त दरात विमानप्रवास करू शकता. प्रवाशांची संख्या वाढली असूनही यावेळी तिकीट दरात 4 ते 9 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. उन्हाळ्यात विमान तिकीट खरेदी करणार्‍यांच्या संख्येत यंदा 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी जास्त असूनही तिकीट दर मात्र कमी असल्याचे आढळत आहे.