Breaking News

मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात


राहुरी : विळदघाट येथील डॉ. विखे मेमोरीयल हॉस्पिटल आणि बारागाव नांदूरचे रामकृष्णहरी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू निदान शस्त्रक्रिया व कानाच्या विविध आजारासंदर्भातील शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. येथील गाडगे महाराज आश्रम शाळेत आज {दि. ६} हे शिबिर पार पडले, अशी माहिती डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी दिली. या शिबिरामध्ये ऐकू न येणार्‍या रुग्णांना श्रवणयंत्र मोफत देण्यात आल्याचे गिरगुणे यांनी सांगितले.