Breaking News

हजरत शहादावल मालिक बाबांचा उरुस उत्साहात


राहुरी येथील आंबी रोडवरील अकील बाबा पटेल वस्ती येथील हजरत शहादावल मालिक बाबा यांचा उरुस मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी {दि. ५ मे} दिवसभर सर्वधर्मिय भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी विविध तरुण मंडळाच्यावतीने चादर अर्पण करण्यात आली.
चैतन्य उद्योग समुहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, अध्यक्ष गणेशराव भांड, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे, दर्ग्याचे व्यवस्थापक अकिल बाबा पटेल यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चादर अर्पण करण्यात आली. यावेळी लोकसेवा मल्टीस्टेटचे चेअरमन नकुल कडू, शिवसेनेचे संतोष कराळे, संतोष चोळके, माजी नगरसेवक डॉ. विश्वास पाटील, अनंत कदम, दीपक पटारे आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी या कार्यक्रमास भेट दिली. दर्गाह परिसरात उरुस निमित्त लंगर (भंडारा) प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. रात्री कव्वालीचा सामना रंगला. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हजरत शहादावल मालिक खादिम कमेटी, अकीलबाबा व अब्बास पटेल परिवार, सुलतान ए हिंद तरुण मंडळ, इनामदार वस्ती तरुण मंडळ, गणेश भांड मित्र मंडळ, राम रहीम एकता मंडळ तसेच मुरलीधर तांबे, बाळासाहेब जोशी, शरद टेकावडे, अप्पासाहेब शेटे, सतीश क्षीरसागर आणि देवळाली प्रवरा परिसरातील भक्तगण, नागरिक आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.