पंतप्रधान मोदी यांना समज द्या !
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला धमकी दिल्यावरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समज देण्याची विनंती केली आहे. आपल्या पत्रात सिंग यांनी मोदी यांनी हुबळी येथे केलेल्या भाषणाचा संदर्भ देत, या भाषणात मोदी यांनी काँग्रेसला धमकी दिल्याविषयी टीका केल्याचे म्हटले आहे. कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारात 6 मे रोजी हुबळीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाले होते. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांच्यावर काँग्रेसने आरोप केल्यानंतर मोदी यांनी पलटवार केला होता. यावेळी मोदींनी काँग्रेसला नॅशलन हेराल्ड प्रकरणाची आठवण करुन दिली होती. असा पक्ष, ज्याचा प्रमुख जामीनावर बाहेर आहे, ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनो, लक्ष देऊन ऐका, जर मर्यादा पार केली तर हा मोदी आहे, महागात पडेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
काँग्रेसच्या नेत्यांनी कान उघडून ऐकावे, जर मर्यादा पार केली तर हा मोदी आहे, महागात पडेल. पंतप्रधान मोदींचे हे शब्द धमकी देणारे तसेच दमदाटी करून अपमान करण्याच्या व शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने वापरलेले होते, असे डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती यांना लिहिलेल्या काँग्रेसच्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या हुबळीतील भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधानपदासाठी घेतल्या जाणार्या शपथेचा उल्लेख करताना, आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने पदाची मर्यादा ओलांडली नाही. आपल्यासारख्या लोकशाही असलेल्या देशात पंतप्रधानपदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारच्या धमकीवजा भाषेचा वापर केलेला नाही, असंही यात म्हटले आहे.
या पत्रात मनमोहन सिंह यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्याही स्वाक्षरी आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांना आपला पक्ष किंवा आपले नेते घाबरणार नाहीत, असेही सिंग यांनी सां गितले. मोदींना अनावश्यक, धमकीवजा व दमबाजी करणारी भाषा वापरण्याच्या विरोधात समज द्यावा, अशी विनंती आपल्या पत्राद्वारे सिंग यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही स्वाक्षरी केली आहे. या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, अशोक गहलोत, दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी, आनंद शर्मा, एके अँटनी आणि अहमद पटेल यांचा समावेश आहे.