नगर पुन्हा हादरले, शिक्षकाचा सख्या भावावर गोळीबार
नगरमध्ये गोळीबाराचे सत्र सुरुच असून पाथर्डीमध्ये किरकोळ कारणावरून शिक्षकाने आपल्या सख्ख्या भावावर रिव्हॉल्वरने गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात भाऊ वाचला पण घरातील कुत्री जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व पेशाने शिक्षक असलेल्या उद्धव मरकड आणि त्यांच्या पुतणीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडुंगे येथे निवृत्त सैनिक असलेले बाळासाहेब मरकड व त्यांचा भाऊ उद्धव मरकड हे दोघे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघांमध्ये किरकोळ क ारणावरून नेहमीच वाद होत होते. या घटनेतील आरोपी असलेल्या उद्धव मरकड याचे त्याच्या नगरमधील बहिणीशी वाद झाल्याने तिने उद्धवला आपल्या घरातून हाकलून दिले होते. ही बहीण निवडुंगे येथे आपला दुसरा भाऊ बाळासाहेब यांचेकडे आली होती.
रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाळासाहेब मरकड हे आपल्या घराच्या बाहेर झोपले होते. या वेळी त्यांना फायरिंगचा व पायाजवळ झोपलेल्या कुत्रीच्या ओरडण्याचा आवाज आला. जागे झाले असता त्यांना घराबाहेर उद्धव मरकड दिसला. ‘मला घरातून हाकलून दिलेल्या बहिणीला तुझ्या घरी का आणले’, या कारणावरून उद्धव याने आपल्यावर गोळीबार केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दरम्यान, या घटनेत गोळी लागलेली कुत्री जखमी झाली आहे.
उद्धव याने ज्या रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला त्याचा परवाना उद्धव व बाळासाहेब मरकड यांची पुतणी पुष्पा मरकड हिचे सैन्यदलातील पती निलेश पानसरे यांच्या नावावर असून त्यांनी हे रिव्हॉल्वर आपल्या पत्नी असलेल्या पुष्पाकडे ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी उद्धव याच्यासह पुष्पाला अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रिव्हालर व क ाडतुसाची पुंगळी जप्त केली आहे. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक पावसे हे करत आहेत.