Breaking News

हिरडगाव फाट्यावर वाहनाच्या धडकेत एक जण ठार


तालुक्यातील हिरडगाव येथील आण्णा दशरथ दरेकर (वय 46) यांचा दि. 29 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हिरडगाव फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, रविवारी आणा दरेकर हे अजनुज गावच्या यात्रेवरून त्यांच्या दुचाकीवरून घरी परत जात असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते हिरडगाव फाट्यानजिक आले असता, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत हिरडगाव येथील रावसाहेब तात्यासो दरेकर यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ही तिसरी घटना असून वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करण्याची आवश्यकता आहे.