Breaking News

दूध दरासाठी भारतीय किसान संघ करणार आंदोलन


पुणे - दूध दरासंदर्भातील प्रश्‍न सोडविण्यात राज्य शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत भारतीय किसान संघा’नेही आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने दुध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 27 रुपये देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत; पण दूध व्यवसायिक ऐवढा दर द्यायला तयार नाही. परिणामी राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी या व्यवसायिकांनी केली आहे. या पार्श्‍वभुमीवर मात्र दूध उत्पादक शेतकर्‍यांना मात्र अल्प दरात दुधाची विक्री करावी लागत आहे. दूध भुकटीचे दर कोसळल्याने ही प रिस्थिती उद्भवलेली असल्याचे व्यवसायिक सांगत आहे.