Breaking News

सीओईपी उभारणार रिसर्च व टेक्नॉलॉजी पार्क


पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) चिखली (ता. हवेली) येथील 11 हेक्टर 30 आर इतकी जागा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जागेवर सीओईपीतर्फे रिसर्च व टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

चिखली येथील गट नंबर 539 मधील 11 हेक्टर 30 आर इतकी जमीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास या संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराकरीता उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने सीओईपी या संस्थेसाठी चिखली येथील जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या जमिनीचे हस्तांतरण त्यांच्याकडे झाल्यानंतर सीओईपीला ही जमीन एक रुपया या नाममात्र दराने 30 वर्षांच्या भाडेपट्याने उपलब्ध होणार आहे.