Breaking News

जवाहर विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात


चांदा - नेवासा तालुक्यातील चांदा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन जवाहर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी नंतर प्राचार्य चंद्रकांत दरंदले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

याप्रसंगी उपप्राचार्य नारायण ढवळे, पर्यवेक्षिका अलकाताई शेरकर , सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य चंद्रकांत दरंदले यांनी आपल्या मनोगतातुन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रा. रावसाहेब राशिनकर यांनी आपल्या मनोगतातून स्वरचित महाराष्ट्र दिन नावाची कविता सादर केली. स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.