Breaking News

लठ्ठपणा तपासणी, उपचार शिबीर


अहमदनगर : अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि सावेडी हॉस्पिटल सावेडी रोड, अहमदनगर येथे दि.7 मे ते 9 मे दरम्यान सकाळी 9 ते 5 या वेळेत लठ्ठपणा या विकारावर मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी दिली. 

शिबीरांतर्गत सर्व रूग्णांची मोफत तपासणी डॉ. सुनिल पवार, डॉ. शकील सय्यद, डॉ. मिनल मेहेत्रे, डॉ. राजेंद्र वाळके यांचेसह आदी डॉक्टर्स करणार आहेत. यामध्ये आजार संपूर्ण बरा होईपर्यंत सर्वांना मोफत होमिओपॅथिक औषधे देण्यात येणार आहेत. तसेच गरजेनुसार ईसीजी, रक्त, लघवी व सोनोग्राफी व एक्स रे तपासण्यांवर 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. तरी सर्व गरजू व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.