Breaking News

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; एकास अटक


संगमनेर :  शहरातील भाजी बाजार परिसरात एका शाळेसमोर असलेल्या शालेय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदाराने ग्राहक म्हणून आलेल्या लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडे अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित दुकानदाराला अटक करण्यात आली. 

पीडित मुलगा शहरातील जय भारत चौकातील शाळेसमोर असलेल्या श्री स्टेशनरी याठिकाणी दहावीची पुस्तके घेण्यासाठी गेला होता. यातील आरोपी दुकानदार राजेश दिगंबर पाठक याने त्याला जवळ बोलावून त्याच्या अंगावर हात फिरवून त्याच्या गुप्त भागास हात लावला. या मुलाने लिंगपिसाट दुकानदाराचा हेतू ओळखून त्याचा हात झटकला आणि तो मुलगा दुकानातून बाहेर पडला. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर त्या मुलाने वडिलांसोबत शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपी राजेश दिगंबर पाठक याच्या विरोधात गुन्हा बाललैंगिक अत्याचार कायदा कलम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी सदर दुकानदाराला अटक केली. आज {दि. २५ } दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास सपोनि राजपूत करीत आहेत.