Breaking News

पुणे आयबीच्या स्वागत कक्षाचे खासगीकरण करण्याचा बाविस्करांचा शहाजोगपणा

बई शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच पुणे साबां विभागातही कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यशैलीमुळे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सोयीस्कर बदनामी पध्दतशीरपणे सुरू आहे. कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी मनमानी करून देखभाल दुरूस्तीवर दाखवलेला खर्च केवळ भ्रष्टाचार नव्हे तर चंद्रकांत दादा पाटील यांची बदनामी करण्यास कारणीभूत ठरला आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना अनेकविध प्रकरणात वादात अडकलेले भरतकुमार बाविस्कर पुणे साबांतही सहकारी अभियंत्यांची डोकेदुखी ठरत आहेत. औरंगाबादमध्ये संभाजी डोणगावकर यांच्या दोन याचिकांसह दहा जनहित याचिका बाविस्कर यांच्याविरूध्द दाखल आहेत. पुणे साबांतील त्यांच्या सहकार्‍यांनी थेट बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन बाविस्कर यांच्या कर्माची कुंडली सादर केले आहे.
शनिवार दि. 12 मे रोजी व्हिव्हिआयपी सर्कीट हाऊसवर महाराष्ट्र राज्य साबां कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीनंतर काही मंडळींनी भरतकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलामध्ये नेहमीच्या दादा द्वेषी बैठकीचा इतिवृत्तांतही कथन केल्याचे समजते.
दरम्यान बैठकांमधून दादांबद्दल द्वेष पसरवताना दुसर्‍या बाजूला पुणे साबांला मिळालेला निधी योग्य पध्दतीने खर्च न करता बोगस देयके काढण्याचे तंत्र वापरून साबां मंत्र्यांची बदनामी भरतकुमार बाविस्कर करीत असल्याची चर्चा साबांत आहे.
या मोहीमेचा एक भाग म्हणून कार्यकारी अभियंता बाविस्कर यांनी पुणे साबांच्या अखत्यारीतील शासकीय विश्रामगृह म्हणजे आयबीच्या स्वागत कक्षाच्या कर्मचार्‍यांचे खाजगीकरण करण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने शासकीय कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वागतकक्षाचे सहा तर दोन वॉचमन खासगी कंत्राटदारांकडून भरून घेतले जाणार असल्याने या ठिकाणी नियुक्त असलेले मुळ शासकीय कर्मचार्‍यांची हे कार्यकारी अभियंता काय सोय लावणार हा खरा कळीचा मुद्दा ठरला आहे.
भरतकुमार बाविस्कर यांनी आयबीचे हा स्वागतकक्ष सागर सर्व्हिसेसला वार्षिक वीस लाखाला आंदन दिल्याने या व्यवहारावर संशय व्यक्त केला जात आहे, अशा प्रकारे खासगीक रण करतांना साबां मंत्रालयाची परवानगी कार्यकारी अभियंत्यांनी घेतली होती का? यातून पुन्हा साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची बदनामी करण्याचा आणखी एक डाव तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.(क्रमशः)
उद्याच्या अंकातः
ऐन पावसाळ्यात दिड महिना तब्बल 900 मजूर पुणे विधानभवनात भरतकुमार बाविस्कर यांनी का राबविले?
पुणे साबांचे अधिक्षक अभियंता रहाणे आणि उपअभियंता पवार यांच्या निवासस्थानावर तीस लाखाचा शासकीय निधी का उधळला? या पुर्वी या निवासस्थानांची दुरूस्ती झाली नव्हती का?
पुणे मध्यवर्ती पणन कार्यालयाच्या देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली सहा लाखाची दोन देयके कशी काढली?
क्लब आफ वेस्टर्न कर्मचारी चाळीत देखभाल दुरूस्तीची कामे न करता 31 मार्चला देयके कशी काढली?