Breaking News

विशेष संपादकीय - मंञालयातील बनवाबनवीचे सुत्रधार पडणार उघडे

सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या बंडूगीरीच्या मुसक्या आवळण्याचा कार्यक्रम मंत्रालय पातळीवरून सुरू झाल्याने शहर इलाखा साबां विभागातून साबां मंत्रालय आणि मंत्री महोदयांची सुरू असलेली बदनामीची मोहीम चव्हाट्यावर येईल. आणि या मोहिमेचे मुळ सुत्रधारही उघडे पडतील असे संकेत आहेत. राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय इमारतीत सन 2015-16 या आर्थिक वर्षात बाराशे ट्रक्स काळा दगड आणला गेला. नऊशे ट्रक्स डेब्रीज मंत्रालय इमारतीच्या बाहेर गेले. आणि त्याच काळात दोनशे ट्रक्स पेव्हरब्ला ॅक वगैरे नुतनीकरण सुशोभीकरणादी कामासाठी आवश्यक साहित्य मंत्रालयाच्या आवारात आल्याचे शहर इलाखा साबां विभागात नोंद आहे. या आर्थिक वर्षात शहर शहर इलाखा साबां विभागाच्या मोजमाप पुस्तिकेत तशी नोंद आहे. इतकेच नाहीतर एकाच दिवशी तब्बल आठशे तीस मजूर 250 टोपली, 250 कुदळ, 250 फावडे 250 टिकाव घेऊन राबत होते डेब्रीज काढून साफसफाई करण्यासाठी. ही देखील नोंद मोजमाप पुस्तिकेत आहे. या नोंदी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतिहासात विक्रम ठरला. हा विक्रम मंत्रालयासारख्या वास्तुची प्रतिष्ठा धुळीस मिळण्यास कारणीभूत ठरते आहे.

एका बाजूला मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत सरकारच्या सर्व सुरक्षा यंत्रणा कुठलीच तडजोड स्वीकारत नसतांना सन 2015-16 या आर्थिक वर्षात विशेषतः दि.23 मार्च ते 24 नोव्हेबंर या कालावधीत जवळपास 2300 ट्रक्स ची आवक जावक आठशे तीस मजूरांची एकाच दिवशी झालेली वर्दळ या सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून सुटली, यावर आश्‍चर्य व्यक्त क रण्यापेक्षा यामागची कुटनिती आणि गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. आणि हे गांभिर्य खर्‍या अर्थाने आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर खर्‍या अर्थाने शहर इलाखा साबां विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या बनवेगीरीचा अध्याय चव्हाट्यावर आला आहे. आता यावर मुख्यमंत्री पातळीवरून या अध्यायाची चिरफाड करण्याचे आदेश जारी झाले असून अवर सचिव संपत सुर्यवंशी, मुंबई साबां दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, मुंबई साबांचे अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांची भुमिका काय असू शकते यावर अधिक भाष्य करू या उद्याच्या भागात.