Breaking News

अनेक गावांतील नळयोजना बंद, दोन-दोन किमी पर्यंत पाण्यासाठी पायपीट संतांच्या भूमीत वृद्धाश्रम खेदजनक बाब : भास्करगिरी

नेवासाफाटा प्रतिनिधी - दैवताप्रमाणे असलेल्या आईवडिलांचा सन्मान करा. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात वृध्दाश्रमाची निर्मिती ही मोठी खेदजनक बाब आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमदभागवत कथा आणि श्री दत्त लक्ष्मीनारायण याग सोहळ्याची गुरुवर्य शनिवारी {दि.२६} मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. त्यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करतांना ते बोलत होते. गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले, या देशाचा आत्मा गोमाता व तीर्थक्षेत्र आहे. ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, तेव्हा भगवंत कोणत्या न कोणत्या रूपाने अवतार घेतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्र काल्याच्या कीर्तनात त्यांनी सांगितले. पक्ष कोणताही असू द्या. मात्र या राष्ट्रातील प्रत्येक माणसाचे हित जोपासणे, हेच ध्येय प्रत्येक नेत्याने ठेवले पाहिजे. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी बुलडाण्याच्या जागृती आश्रम येथील भागवत कथाकार महंत गुरुवर्य शंकर महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज, महंत गोपाला नंदगिरी महाराज, गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री प. पू. सरूबाई पाटील, माजी आ. नरेंद्र घुले पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, हभप नारायण महाराज, हभप पंढरीनाथ महाराज तांदळे, हभप मारुती महाराज काळे, हभप गणेश महाराज पेसोडे, हभप नामदेव महाराज कंधारकर, हभप रामनाथ महाराज पवार, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, मराठवाडा भक्त मंडळाचे बजरंग विधाते, राम विधाते, हभप विवेक साबे, गंगापूर येथील युवा नेते संतोष माने, ज्ञानदेव लोखंडे, हभप अतुल महाराज आदमने, गंगापूर येथील मृदूंगाचार्य हभप गिरीजानाथ महाराज जाधव, नगर भक्त मंडळाचे सुनील नाळके, संत सेवेकरी बदाम महाराज पठाडे, चोपदार बंटी महाराज पठाडे, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, ह.भ.प. लक्ष्मीनारायण जोंधळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, काकासाहेब नरवडे, जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे, वैजापूरचे उद्योजक मोहनराव आहेर, राजेंद्र पेसोडे, हभप गणपत महाराज आहेर, चोपदार तात्या महाराज शिंदे, बगडीचे सरपंच कैलास बोडखे, निवृत्ती सुडके, कारभारी ज-हाड, मनोज पवार, हभप विजय महाराज खेडकर, सीताराम जाधव, कचरू तात्या भागवत, हभप बाळू महाराज कानडे, गायनाचार्य दौलतराव मनाळ, गोरख मनाळ आदींसह नगर, पिंपराळा, औरंगाबाद, पंढरपूर, येथील भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, श्रीरामपूर येथील दत्तात्रय लबडे, मुंबई येथील नामदेव मोरे, दहिगावने येथील गहिनीनाथ संकुडे, जांभळी येथील शहादेव आव्हाड, गंगापूर येथील डॉ. जयराम पाव्हणे यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


यासाठीच भगवंतांचा मनुष्यरूपात अवतार 

भगवंतांनी स्थापन केलेला धर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. धर्माला नष्ट करणारे संपले. मात्र धर्म कधी संपला नाही. इतर भाषेचा सन्मान जरूर करा. मात्र मायबोली असलेल्या मराठी भाषेचा ही सन्मान करा. तिचा अनादर करू नका. साधूंचे रक्षण व दुर्जनांचा संहार भगवंतांने मनुष्यरूपात अवतार घेऊन केला.