Breaking News

कामगारांनीच लुटले सव्वा कोटी रुपये

सोलापूर, दि. 18, मे - शिवस्मारक परिसरात असलेल्या निवास मशिनरीज दुकानात काम करणार्‍या तिघा कामगारांनीच दुकानातील मशिनरी साहित्य अन्यत्र नेऊन विकले. चेकद्वारे पैसे काढून घेतले. मशिनरी साहित्य विक्रीतून आलेलेल पैसे आपल्या खात्यात वळवून घेऊन साधारण 1 कोटी 28 लाख, 25 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रजा जाजू यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे. सुदर्शन साका, अरविंद साका, निशांत बुलबुुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2016 पासून हा प्रकार सुरू होता. प्रजा यांच्या वडिलांचे निवास मशिनरीज फर्म होते. मध्यंतरी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर दुकानात काम करणार्‍या तिघांनी मिळून या दुकानाचा ताबा घेतला. सुमारे पंच्याहत्तर लाखांचे दुकानातील साहित्य परस्पर विक्री केली. तिघेजण पुन्हा भागवत टॉकीज शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये न्यू अ‍ॅडव्हान्स न्यूमटीक या दुकान गोडावूनमध्ये व रेनबो टॉवर्स मेकॅनिक चौक येथील गोडावूनमध्ये आणि आंध्र लॉज, शिवाजी चौक येथे काही साहित्य नेऊन ठेवले.