Breaking News

छ.संभाजीराजे लढवय्या योद्धा - दीपक पवार

सातारा, दि. 18, मे - हिंदवी स्वराजाचे द्रपती संभाजीराजे यांनी युगनिर्माते छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाचे प्राणपणाने संरक्षण केले. आपल्या हयातीत एकही लढाई न हारलेले छत्रपती संभाजीराजे लढवय्या योद्धा होते, असे गौरवोद्गार भाजपाचे जि. प. सदस्य दीपक पवार यांनी काढले. 

शनिवार पेठेतील नरसिंह मित्र समूह आणि सीपीआयच्यावतीने छत्रपती संभाजीमहाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, छत्रपती संभाजीराजेंची जयंती कॉ. किरण माने यांनी पहिल्यांदा सुरु केली, त्याचा मी साक्षीदार आहे. ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, ते राजे लढवय्या होते. या योध्याला नमन करताना आज धन्य झाल्यासारखे वाटत असून हा दिवस अखंड राज्यातच नाही तर सबंध हिंदुस्थानात उत्साहाने साजरा झाला पाहीजे. मान्यवरांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला व छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सरबत वाटप क रण्यात आले. मंडळाच्यावतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.