Breaking News

वाळुज परिसरामध्ये कार अपघातात 2 ठार

औरंगाबाद - शहरातील वाळुज परिसरात कार अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसर्‍या व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतून औरंगाबादकडे येत असताना एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एका जणाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला होता. या अपघातातील अन्य 2 जखमींवर घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातातील कृष्णा रामभाऊ बुटे (38 वर्षे) व मनोज भालचंद्र शेडुते (रा.जालना) यांचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर शिवाजी कुलथे (रा. वैजापूर) व सुभाष मुंडलिक (रा.ठाणे) हे जखमी झाले आहेत. या दोघांवर घाटीत उपचार सुरु आहेत.