Breaking News

वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या पदाबाबत चर्चांना उधाण

सातारा, दि. 18, मे - वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी शौचालयाच्या बांधकामाचे 1 लाख 40 हजार रूपयांचे बिल काढण्याच्या बदल्यात 14 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी प्रतिभा शिंदे व पती सुधीर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झाला होता. यामुळे नियमांचा भंग झाल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करून पुढील 6 वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

 
शौचालयाचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे महाराष्ट्र अधिनियम 1965 च्या कलमांचे उल्लंघन होते. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी शिंदे यांना लेखी खुलासा करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर खुलासा दिलेल्या मुदतीत न दिल्यास याबाबतीत त्यांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.