Breaking News

कार्यकारी अभियंता बाविस्कर बनले पुणे साबांचे सौदागर शहर इलाखासह नाशिक साबांतील म्होरक्यांशी साधले संधान

पुणे/विशेष प्रतिनिधी - कार्यकारी अभियंता पातळीवर केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी कनिष्ठ वर्गातील कर्मचार्‍यांना बदनाम करण्याचा हीनपणा करण्याचा प्रमाद करणारे भरतकुमार बाविस्कर चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याचीही खेळी खेळत असल्याने पुणे साबांचे बाजारी करून स्वतः सौदागर बनल्याची चर्चा पुणे साबांत सुरू आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता म्हणून काम करीत असताना भरतकुमार बाविस्कर यांनी 31 मार्चला एका दिवसात वर्क आर्डर, मोजमाप पुस्तिकेत नोंद आणि कं त्राटदाराला देयके अदा करण्याचा विक्रम नोंदविला.पुणे साबांत रूजू झाल्यानंतर देखीला तोच कित्ता भरतकुमार बाविस्कर गिरवित असून व्यवहाराचा प्रकार बदला असला तरी पध्दत मात्र तिच आहे.
आयबीपासून ससून रूग्णालयापर्यंत, येरवडा कारागृहापासून मध्यवर्ती पणन कार्यालयापर्यंत बोगस कामे दाखवून देयके अदा करण्यात हातखंडा असलेल्या भरतकुमार बाविस्कर यांनी साबांचे अधिक्षक अभियंता रहाणे आणि उपअभियंता पवार यांच्या निवासस्थानाची देखभाल दुरूतीतही हात साफ केल्याची चर्चा आहे. बाविस्कर यांनी पुणे साबां कार्यकारी अ भियंता पदाचा कार्यभारा स्वीकारल्यापासून देखभाल दुरूस्तीच्या नावावर कामे न करता कोट्यावधी रूपये शासकीय निधीचा अपहार केल्याची वाच्छता आहे.
भरतकुमार बाविस्कर केवळ भ्रष्टाचारावर समाधानी नाहीत तर चंद्रकांत दादा पाटीर यांची बदनामी करणार्‍या शहर इलाखा आणि नाशिक साबांतील म्होरक्यांशी त्यांचे संगनमत असून पुणे विभागाचे ते नेतृत्व करीत आहेत.दादांच्या बदनामीला पुण्यातून मुर्तरूप देण्यासाठी दादांचे राजकीय विरोधक असलेले आमदार, माजी आमदार आणि राजकीय सामाजिक नेत्यांना आयबी सोडण्याची नोटीस बजावण्याचा शहाजोगपणा बाविस्कर यांनी करून हा प्रमाद लपविण्यासाठी आयबीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी परस्पर सुट देऊन गैरप्रकार करीत असल्याची बतावणी केली. यासंदर्भात अधिक वृतांत उद्याच्या अंकात (क्रमशः)