Breaking News

शहर इलाखा साबांची हायप्रोफाईल दरोडेखोरीच्या मुसक्या बांधणार दादांना सजग करण्याची जबाबदारी श्रीनिवास जाधवांवर

मुंबई/ विशेष प्रतिनिधी - मुंबई शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांची हायप्रोफाईल दरोडेखोरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चौकशीच्या प्रक्रियेत आल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बदनामीचा खटाटोप करणारे बांधकामच्या झारीतील भ्रष्ट शुक्राचार्यांचा खरा चेहरा उघड होण्याचे संकेत आहेत. दरम्यान या प्रक्रियेत साबां मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांची जबाबदारी वाढली असून वस्तुस्थिती दादांच्या निदर्शनास आणून बदनामीचे षडयंत्र थोपविले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सन 2015-16 या आर्थिक वर्षात शहर इलाखा साबां विभागातून मंत्रालयाचे सुशोभीकरण, देखभाल दुरूस्तीवर खर्ची दाखवण्यात आलेल्या निधीच्या मुद्यावरून फडणवीस सरक ारची प्रतिष्ठा ऐरणीवर आली होती.विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या एकूण राजकीय राजकीय कारकिर्दीच्यादृष्टीने शहर इलाखा साबांतील कार्यकारी अभियंत्यांनी घातलेला हा घोळ घाटावरचे वळण मानले जात आहे.
प्राप्त माहीतीनुसार सन 2015-16 या आर्थिक वर्षात तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी बनावट कामे दाखवून पंधरा कोटीची हेराफेरी केल्याचे सांगीतले जाते. ही मंडळी मंत्रालयात बाराशे ट्रक्स डबर, दोनशे ट्रक्स पेव्हर ब्लॉक आणि तत्सम सुशोभीकरणासाठी आवश्यक असलेली सामग्री मंत्रालयात आणल्याचे तसेच हजारो मजूरांना मंत्रालयात राबविल्याचे दाखवून नऊशे ट्रक्स डेब्रीज मंत्रालयाच्या बाहेर काढल्याचे मोजमाप पुस्तिकेत नोंद करून मोकळी झाली. एवढ्यापुरते हे प्रकरण मर्यादीत असते तर केवळ भ्रष्टाचार म्हणून या प्रकरणाकडे पहाणे शक्य होते. तथापी भ्रष्टाचारापलिकडे या प्रकरणाची व्याप्ती असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
शहर इलाखा विभाग आणि एकूणच साबां विभागात पुर्वसुरींशी निष्ठा असलेली मंडळी कार्यरत असून चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याचे षडयंञ पध्दतशीरपणे राबवित आहेत. शहर इलाखा विभागातील हा सावळा गोंधळ त्याच षडयंत्राचा एक भाग आहे, असा दावा साबांतून केला जात आहे.
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय इमारतीत एवढा मोठा घोटाळा होणे राज्य सरकार आणि साबां मंत्र्यांच्या प्रातिष्ठेला धक्का मानला जाऊन राजकारण आणि समाजमानसात आपसूक बदनामी होईल, हा हेतू त्यामागे होता. हा अपहार उघड झाला तर ... ही शंका या मंडळींना होती. त्याचा उपायही आधीच शोधला गेला होता. चौकशी करण्याची वेळ आली तरी जास्तीत जास्त अधिक्षक अभियंता पातळीवर चौकशी होऊन प्रकरण निकाली काढता येईल, प्रकरणाचा धुराळा उडत राहील तोवर सरकार आणि मंत्र्यांची बदनामी मात्र होत राहील.
या नियोजनाच्या अर्ध्या टप्यापर्यंत ही मंडळी यशस्वी ठरली. नंतर त्यांचा अंदाज चुकला आणि आ. चरणाभाऊ वाघमारे यांनी हे गंभीर असलेले प्रकरण तितक्याच गंभीरतेने हाताळून मुख्यंमंत्र्यांकरवी या अपहाराची तड लावण्याचा निश्‍चय केला आणि अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी मंगळवारपासून या चौकशीला प्रारंभ केला आहे. धनंजय चामलवार यांची चौकशीची शैली लक्षात घेता शहर इलाखा साबां विभागात शिजलेले कटकारस्थान चव्हाट्यावर येईल, या विषयी खात्री व्यक्त केली जाऊ लागल्याने हांडे गोटात अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, चंद्रकांत दादा पाटील यांच्या बदनामीच्या कारस्थानासंदर्भात आजवर मिळालेली आणि नव्याने मिळू शकणारी माहीती संकलित करून चंद्रकांत दादांना दादा पाटील यांना सजग करण्यासंदर्भात त्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे