Breaking News

शिका, पण जरा हटके...बांबू तंत्रज्ञानातील पदविका


बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे कालावधीचा बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून कमीत कमी दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो. यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता आहे. अल्पमुदतीच्या पुर्ण वेळ दोन वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपण आगळ्या वेगळ्या अशा शिक्षणक्षेत्रात ना केवळ पाऊल टाकू शकतो परंतु हे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्या स्वयंरोजगाराची वाट ही प्रशस्त होऊ शकते. या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला असून केंद्रातर्फे राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय विद्यार्थ्यांना १५०० रुपये दरमहा या पद्धतीने विद्यावेतन देखील दिले जाते.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बांबूक्षेत्रांना भेटी देण्यासाठी नेले जाते. आत्तापर्यंत बल्लारपूर बांबू डेपो, बांबू उद्यान वडाळी नर्सरी, अमरावती यासारख्या ठिकाणी अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे तर प्रस्तावित दौऱ्यांमध्ये अगरबत्ती प्रकल्प, बांबू कंस्ट्रक्शन साईट, बांबू केन डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट आगरतला, संपूर्ण बांबू केंद्र, आय.आय.टी मुंबई, यासारख्या ठिकाणी भेटी प्रस्तावित आहेत.