Breaking News

विजय भालसिंग यांना शंभूराजे समाजभूषण पुरस्कार प्रदान


अहमदनगर - नगर तालुक्यातील वाळकी गावाचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने राज्यस्तरीय शंभूराजे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे छावाचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वनाथ वाघ, नगरसेविका मालनताई ढोणे, कर्नल काशिद, देवेंद्र कवडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज कर्डिले, अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड.महेश शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, पोपट बनकर आदि उपस्थित होते.

विजय भालसिंग हे जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांचे अनाथ मुलांसाठी कार्य चालू आहे. त्यांनी अनाथ मुलांची उत्तम सेवा तसेच सनातन वैदिक धर्म वारकरी भागवत सांप्रदायिक मंडळाच्या माध्यमातून समाज सेवेचा आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे. वंचित घटकांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. या त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत त्यांना शंभूराजे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना यापूर्वीही विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.