Breaking News

डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : डिजिटल उद्योग व डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे सध्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. महाराष्ट्राने यापूर्वीच डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, मेट्रो, रस्ते आदींच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत निर्माण करत आहोत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सेवा विषयक चौथ्या जागतिक प्रदर्शनात राज्याच्या परिसंवादात श्री . फडणवीस बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) चे अध्यक्ष चंद्रदीप बॅनर्जी, स्पेनटा मीडियाचे माणिक डावर,ॲपटेकचे निनाद करपे आदींनी या परिसंवादात सहभाग घेतला.