Breaking News

६१ हजारांचा गुटखा जप्‍त


कोपरगाव : शहर पोलीसांनी बस स्‍टॅन्‍ड परिसरातील होडे दुकान व कटाळे पान दुकान येथे छापा मारला. यात विविध प्रकारचे गुटखा व सुगंधी तंबाखु असा ६१ हजाराचा माल जप्‍त करण्यात आला. हा दंडात्‍मक गुन्‍हा असल्‍याने दोन्‍ही दुकान मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाईसाठी अन्‍न आणि प्रशासनाला कळविण्यात आले असल्‍याची माहिती शहर पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. पोलिसांनी यात हिरा पानमसाला, रॉयल सुगंधी तंबाखु, विमल पानमसाला, व्‍ही ०१ किंग टोबॅको, आर. एम. डी. गुटखा व पानमसाला सेटेंड तंबाखू असा ६१ हजार ८५ रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.