नवीन तंत्रज्ञान देण्याची जपानच्या शास्त्रज्ञांची हमी
राहुरी ता. प्रतिनिधी - शेतीविषयी जपानमध्ये वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान देवळालीप्रवराच्या शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याची हमी जपानच्या शास्त्रज्ञांनी. आधुनिक शेतीसंदर्भात जपानमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञानासह पुढील दोन महिन्यांत देवळालीप्रवरा येथे भेटीवर आले आहेत. हे शास्त्रज्ञ येथील शेतक-यांना शेतीसंबधीत नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देऊन झिरो बजेट ऑरगॅनिक शेती कशा प्रकारे करावी आणि उत्पन्न कसे वाढवावे, याचे मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती या पथकाचे प्रमुख मंजुसत्या गुरु (कोची) यांनी दिली.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी शहरात परदेशातून आर्थिक गुंतवणूक व्हावी, शेतीप्रधान मोठे उद्योगधंदे उभारण्यात यावेत आणि शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी जपानमधील सामाजिक कार्य करणा-या पथकास निमंत्रित केले होते. त्यांच्या विनंतीस मान देत देवळालीप्रवरा शहराला जपानच्या ६५ सदस्यांच्या पथकांनी भेट दिली. या पथकात हरदा आयोतोशी, सुनजी निशची, ताईश निशुची, तोमोहितो निशुची, होकुओ सोनय, माकी मतोयशी, करीम मतोयशी, ताकायकी मतोयशी, हमदा नोरीको, मंत्सुहिसा मसामी, सकाहिरा येनोको आदींचा समावेश या पथकातील काही सदस्यांनी बैलगाडीतून फेरफटका मारल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. जपानच्या या पथकातील शास्त्रज्ञांचा नगराध्यक्ष या नात्याने सत्यजित कदम आणि प्रीती कदम यांनी स्वत:च्या घरी महाराष्ट्रीयन पध्दतीने फेटे बांधून तर महिलांना सौभाग्याचे लेणं असलेल्या बांगडया भरून या सर्वांचा गौरव केला.