महावितरण देणार एका रोहीत्रावर दोनच कृषिपंपाची जोडणी
श्रीगोंदा:महावितरण कंपनीने नवीन योजना आमलात आणली असून, शेतकर्याने शेतात काही पिके घेतली तरी नफा आणि तोटा सहन करुन महावितरणाचे बिल अदा करायचे आहे. इलेक्ट्रिक मिटरसह पडणारे बिल हे मिटर फिरेल एवढेच मर्यादित असणार आहे, पंरतु अगोदर विज जोडचे पैसै निल असले पाहीजे, ही योजना पोल शिवाय असणार आहे.
कृषिपंपधारक शेतकर्यांसाठी महावितरणकडून चांगली बातमी आहे. वीज जोडणीची मागणी केलेल्या 2 लाख 25 हजार कृषिपंपधारक आणि लघुदाब वाहिनीवरील सध्याच्या 40 लाख 68 हजार कृषिपंपधारकांना लवकरच हाय व्होल्टेज वीजजोडणी मिळणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने उच्च दाब वितरणप्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, एका डीपीवर (रोहित्र) यापुढे दोनच कृषिपंप असणार आहेत. त्यामुळे वीज ट्रिपच्या कटकटीपासून शेतकर्यांना कायमची मुक्ती मिळणार आहे. महावितरणला यासाठी पाच हजार कोटींचा खर्च येणार आहे.
राज्यात 40 लाख 68 हजार 220 कृषिपंपधारक शेतकरी आहेत. तसेच 2 लाख 24 हजार 785 शेतकर्यांनी वीज जोडीसाठी पैसेही (कोटेशन) भरलेले आहेत. या प्रलंबित शेतकर्यांनाही महावितरणकडून हाय व्होल्टेज वीजजोडणी दिली जाणार आहे. आजपर्यंत कृषिपंपांना 63 ते 100 केव्हीएची वीज जोडनी दिली जात असे. एकाच डीपीवर (रोहित्र) अनेक कृषिपंप जोडलेले असत. त्यामुळे लोड येऊन वीज ट्रिप होत असे. अनेकदा रोहित्र जळतात. तात्काळ नवे रोहित्र मिळत नाही. विजेअभावी शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावे लागतो. विहिरीत पाणी असूनही पिके जळून जात आहेत. त्यामुळे वैतागलेल्या काही शेतकर्यांकडून आकडा टाकून वीज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता उच्च दाब योजनेत एका डीपीवर दोन कृषिपंप असतील. त्यामुळे शेतकर्यांमध्ये डीपीसंदर्भात आपनच मालक असल्याची भावना निर्माण होईल आणि वीज चोरीचे प्रकार थांबतील.