राष्ट्रवादी राबवणार ‘एक बूथ दहा यूथ’अभियान
सोलापूर, दि. 30, मे - भाजप सरकाराने दिलेल्या खोट्या आश्वासनांमध्ये मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकला मतदारांचे पाठबळ मिळत आहे. पक्षामध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे एक बूथ दहा युथ हे अभियान सुरू केले आहे. शहरामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून युवकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले. अभियानच्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी कोषाध्यक्ष अहमद मसूलदार, प्रवीण साबळे, चिंतामणी सपाटे, जहीर गोलंदाज, रमेश कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष बागवान म्हणाले, शहरातील युवकांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भक्क मपणे उभारण्यात येईल. त्यासाठी पुढील तीन महिन्यांमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ’एक बूथ दहा युथ’ अभियान प्रभावी राबविण्यात येईल. शहरातील 26 प्रभागांमध्ये युवक का ँग्रेसच्या शाखा काढण्यात येणार असल्याचे बागवान यांनी सांगितले. मुंबई येथील बैठकीत राज्यातील सर्व शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना बूथनिहाय उद्दिष्ट दिले आहे. मोहिमेच्या माध्यमातून अधिक तरुण जोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.