Breaking News

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार


ठाणे, दि. 08, मे - स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार 9 मे रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून गुरुवार 10 मे रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळ्यापूर्वी पंपिंग स्टेशनमधील सब स्टेशनची दुरुस्तीची कामे करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेस स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा बुधवार 9 मे रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार 10 मे रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत (24 तास) बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्र सिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.