मराठामोळया दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी
न्यूयॉर्क : मूळ महाराष्ट्रीयन असलेली दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्क सिटीच्या दिवाणी न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नईच्या राजा राजेश्वरी यांच्यानंतर दीपा या न्यूयार्कमध्ये न्यायाधीश बनलेल्या दुसर्या भारतीय महिला आहेत. न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल दा ब्लासियो यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील प्रस्ताव जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की दीपा आंबेकर (41) यांची दिवाणी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे त्या क्रिमीनल कोर्टात सेवा बजावणार आहेत.
दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्क सिटी परिषदेवर 3 वर्षे वरिष्ठ पदावर काम केले आहे. तसेच नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्यांनी त्यांचे पदवीपूर्व पदवीचे शिक्षण मिशिगन विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तर, रुटर्स लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. महापौरांनी आंबेकर यांना दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे. त्यासोबतच कौटुंबीक न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या फेरनियुक्तीबद्दलही घोषणा केली आहे. यापूर्वी 2015 मध्ये राजेश्वरी दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. त्यासोबतच न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीश बनलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.