Breaking News

शनैश्वर महाराज कथा सोहळा उत्साहात


कोपरगाव : तालुक्यातील तळेगाव मळे येथे सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शनैश्वर महाराज जयंतीनिमित्त शनैश्वर महाराज कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात कथाकार नामदेव महाराज बिडकर यांच्या सुश्राव्य वाणीतून तळेगाव मळे व पंचक्रोशीतील भाविक शनैश्वर महाराजांची कथा श्रवण केली.
यानिमित्त रोज सकाळी ४ ते ६ काकडा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते १० शनैश्वर महाराज कथा कार्यक्रम होत असे. मंगळवारी {दि. १५ } महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने कथा सोहळ्याची सांगता होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तळेगाव मळे येथील श्री शनैश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनीही मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून मदत करण्याचा वारसा जोपासला असल्याचे तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर यांनी सांगितले. 

यावेळी अॅड. आर. टी. भवर, उपसरपंच रघुनाथ टूपके, वाल्मिक पिंपळे, दत्तात्रय देवकर, अशोक टूपके, तुकाराम जाधव, मंजाहारी टूपके, जनार्दन भवर, रामदास टूपके, गोपाळराव भवर आदी मान्यवरांसह तळेगाव मळे व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.