Breaking News

दरोड्याच्या तयारीतील लुटारुंच्या मुसक्या आवळल्या


राहुरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री {दि. १५} दरोड्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांच्या शनिशिंगणापूर फाटा येथे मुसक्या आवळल्या. या आरोपींकडून एक गावठी कट्टा, तीन काडतूस, धारदार सत्तूर, मिरची पूड, दोन दुचाकी असा १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला. दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले.
यासंदर्भात राहुरी पोलिस ठाण्याचे पो. काॅ. मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुन्हे शाखा पो. नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरिक्षक सुधीर पाटील, पो. हे. काॅ. उमेश खेडेकर, पो. काॅ. मन्सूर सय्यद, फकिर शेख, विजय ठोंबरे, रविंद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, संदिप पवार, संदिप घोडके, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे आदींनी या पथकात सहभाग घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिपीन रावसाहेब पवार, {रा. लक्ष्मीनगर, शिर्डी ता. राहाता}, महेश रामकरण विश्वकर्मा {रा. संगमनेर रोड, नार्दन ब्रँच, श्रीरामपूर, निरंजन तुकाराम थोरात { रा. हाउसिंग सोसायटी शिर्डी ता राहाता}, अरिफ युनुस शेख { रा. विरार ईस्ट, सुरम पार्क ठाणे}, गोरक्ष नवनाथ कांबळे {रा. हनुमान नगर कोपरगाव}, राहुल लक्ष्मण बंदीवान {रा. मारुती मंदिर नेवासा}, मोहसिन फिरोज शेख {रा. सुभेदार वस्ती, बिफ मार्केटजवळ, श्रीरामपूर यांचा समावेश आहे.