Breaking News

‘आत्मा मालिक’च्या एनडीए अकॅडमीचा पालक मेळावा उत्साहात


कोपरगाव : येथील आत्मा मालिकमध्ये नव्याने सुरु झालेल्या एनडीए अकॅडमीमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्पोरेट शहरापेक्षा अधिक सुविधा येथे आहेत. कमी काळात अधिक सक्षम विद्यार्थी घडल्याची कबूली पालकांनी दिली. आत्मा मालिक एनडीए अकॅडमीमध्ये आमचा मुलगा शिक्षण घेत असल्याने आमच्या आत्म्याला समाधान मिळत आहे. देशसेवेसाठी अधिकारी पदावर जाण्याचा उत्तम मार्ग आम्हाला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केली.
प्रारंभी प्राचार्य योगेश पुंड प्रास्तविक यांनी केले. कमी काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या व मेहनती शिक्षक, कर्मचारी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. अकॅडमीच्या यशाबद्दल व मुलांच्या भावी वाटचाली संदर्भात माहिती देवून भविष्यात सैन्य दलात सर्वाधिक अधिकारी आत्मा मालिककचे राहतील, असा आत्मविश्वास आशुतोष पांडे, संतोष पांडे, कर्नल तारीक शेख, तेहसीन शेख यांनी व्यक्त केला. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘एनडीए’मध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षण घेऊन देशसेवेची आवड असनाऱ्यायांना येथून बळ मिळते. ओम गुरुदेव माऊलींचा विचार व आशिर्वाद आपल्यासोबत आहे. अगदी कमी काळात आत्मा मलिक एनडीए अकॅडमीचे विद्यार्थी यशस्वी होत आहेत.

दरम्यान, आत्मा मालिक संकुलाने विद्यार्थी व संकुलाच्या माहितीचे परीपूर्ण मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅपव्दारे आपल्या पाल्याचे मार्क्स, हजेरी, वेगवेगळया परीक्षा, संस्थेची माहिती पालकांना घरबसल्या पाहता येऊ शकते. यासंदर्भात प्रशांत खिलारी यांनी मोबाईल अॅपची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. गुणवंत विद्यर्थी व त्यांच्या पालकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रकाश भट, विठ्ठलराव होन, दत्तात्रय पवार, शिवजी गुप्ता, विजय थोरात, वसतिगृह अधीक्षक प्रदीप निपुंगे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.