अहमदनगर - नुकतेच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल पै.राहुल आवारे यांचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व छबुपैलवान प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पै.छबुपैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ पै.आवारे यांना 51 हजार रुपयाचे बक्षिस देण्यात आले. पै.आवारे यांचे शहरातील सर्जेपुरा येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, नगरसेवक पै.सुभाष लोंढे, पै.नामदेव लंगोटे, पै.विलास चव्हाण, पै.गणेश कोरडे, पै.लहानू शिंदे, पै. सुनिल भिंगारे, पै.कैलास हुंडेकरी, पै.मोहन हिरणवाळे, पै.बबलू जाधव, पै.महेश दांगट, पै.दादा दांगट, पै.भैय्या केदार, विकी उबाळे, पै.विलास चव्हाण, पै.चेतन सपकाळ, पप्पू जहागीरदार, रवी चव्हाण आदि उपस्थित होते.
पै.वैभव लांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावंत खेळाडू पुढे येत आहे. मात्र परिस्थितीअभावी त्यांना पुर्णवेळ खेळासाठी देता येत नाही. राहुले आवरे यांने परिस्थितीवर मात करुन यशोशिखर गाठले आहे. अशा प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य जिल्हा तालिम संघ करीत आहे. खेळाडूंना पदक मिळाल्यानंतर त्याचा सन्मान होतो, बक्षिसे मिळतात. मात्र गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत मिळाल्यास तो भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करीत पदक खेचून आनणार आहे. येत्या ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदकाची अपेक्षा वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.