Breaking News

तुर्भे, कोपरखैरणे व घणसोली विभागात अनधिकृत बांधकामांवर हातोडा


नवी मुंबई, दि. 05, मे - महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत असून आज तुर्भे, कोपरखैरणे व घणसोली येथील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

यामध्ये तुर्भे विभागांतर्गत ए-1 टाईम मधील घर क्र. 26/1, 26/2, व 124/3 याठिकाणी अनधिकृत वाढीव बांधकाम सुरु होते. या अनधिकृत बांधकामास तुर्भे विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजाविण्यात आली होती. तरी देखील संबंधिताने अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवल्याने सदर बांधकामावर निष्कासनाची क ारवाई करण्यात आली. तसेच ए.पी.एम.सी. मार्केट मधील अनधिकृतपणे पदपथावर व्यवसाय करणा-या 5 टप-यादेखील निष्कासित करण्यात आल्या. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोपरखैरणे सेक्टर 11 येथील सन 2000 नंतरच्या एकूण 45 अनधिकृत झोपड्या निष्कासीत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे घणसोली विभागात शिवाजी तलाव रोड येथील सरस्वती महादेव अय्यर यांचे चौथ्या मजल्याचे वाढीव बांधकाम, दत्तनगर, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ प्लीन्थ लेवलचे बांधकाम सुरु असलेले हैदर अली खान यांचे बांधकाम, तसेच प्रकाश पवार यांचे घणसोली विभाग क ार्यालयासमोर सुरु असलेले अनधिकृत बांधकामांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्या अनुषंगाने हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेची सुनियोजित शहर ही प्रतिमा जपण्यासाठी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर अशाच प्रकारच्या धडक कारवाया यापुढील काळातही सुरु राहणार आहेत.