आईच्या कुशीतून चोरलेले बाळ जंगलात बेशुद्धावस्थेत सापडले; नरबळीचा संशय
इगतपुरी, दि. 05, मे - तालुक्यातील झारवड बु. ग्रामपंचायतीच्या हद्दीत दापुरे येथील पाचकुंडल्याच्या वाडीत अंधश्रद्धेपोटी बालकाचा नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पाचकुंडल्या वाडी पासून काही अंतरावर असलेल्या जंगलात काही दगडावर कर्मकांड केले गेले असल्याने त्यात जवळ एक बालक सापडले असल्याने त्यावरुन येथे काही अघोरी कृत्य होणार होत क ा? असा संशय श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी व्यक्त केला असून अज्ञात व्यक्ती विरोधात नरबळी देण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी मध्यरात्री मंगला चौधरी या मातेच्या कुशीत झोपी गेलेले चार महिन्याचे बाळ अचानक गायब झाले.पहाटे जाग आली असता तिला बाळ शेजारी नसल्याचे निदर्शनात येताच तिने आरडा ओरडा सुरु केला. त्यावेळी घराच्या लोकांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या घरातील हालचालींमुळे शेजारच्या लोकांनाही सदर घटनेची माहिती मिळाली असल्याने त्यांनीही शोधा शोध करण्यात सुरुवात केली. पोलिसांना कळवलं सकाळी पाचकुंडल्याच्या वाडी जवळ असलेल्या जंगलात बालक बेशुद्धावस्थेत सापडून आले.
परंतु त्या जागेच्या काही अंतरावर कोबडीचे पिल्लू, नारळ, वाटी, एक पुजलेला दगड, लिंबू, खारीक, सुपारी, बदाम, एक रुपया आदी वस्तू सापडून आल्या आहे. मात्र बाळाच्या आई वडीलांनी याबाबत कोणतीही फीर्याद न दिल्याने घोटी पोलीसात या प्रकरणाबाबत अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.